नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविधतेतली एकता तसंच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात आजपासून एक भारत श्रेष्ठ भारत ह्या अभियानाला सुरुवात होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या अभियानाचे आयोजन केले आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान सुरू राहील.

भारतातल्या विविध भागांना सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशानं, हे अभियान सुरू करावे अशी कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली झालेल्या राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मांडली होती.

दरम्यान एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाअंतर्गत जम्मू कश्मीरमधल्या पन्नास युवकांचा गट तामिळनाडूच्या पंधरा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार  आहे. हा गट तिथे अनेक विकास कार्यक्रम, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था तसंच वारसा स्थळांना भेट देतील. त्यांनतर तामिळनाडूमधील ५० युवकांचा गट जम्मू आणि काश्मीरला भेट देईल.