नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज मुंबईत पहिली बैठक होणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही बैठक बोलावली आहे.

एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील तसेच विजय वडेट्टीवार हे मंत्री या समितीचे सदस्य आहेत.

दरम्यान, मुंबईतल्या आझाद मैदान इथे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या शिष्ठमंडळाने काल चव्हाण यांची भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या मांडल्या.