राज्य तंत्रशिक्षण मंडळ नियामक परिषदेची 32 वी बैठक
  
मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वत:च्या पायावर उभे राहू, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी राज्यामध्ये आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करावीत. विशेषतः प्रत्येक विभागातील अडचणी लक्षात घेऊन त्यावर आधारित पदविका अभ्यासक्रम तयार करावा. त्यामुळे स्थानिक पातळींवरील अडचणी सोडविण्यास मदत होईल आणि रोजगार निर्मिती होईलअसे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय येथे राज्य तंत्रशिक्षण मंडळ- नियामक परिषदेची 32 वी बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
श्री.सामंत म्हणालेराज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयासाठीच्या पुणे येथील बांधकामाच्या पुनर्विलोकित सुधारित अंदाजपत्रकाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यामध्ये इमारतीचे बांधकाम लवकर पूर्ण करुन शिक्षक प्रशिक्षण केंद्राकरिता इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सोयीसुविधा निर्माण करुन या केंद्रातून प्रशिक्षणास सुरूवात करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.
या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पुढील 5 वर्षाकरिता 2019-2024 बृहत आराखड्याच्या (Perspective Plan) अंमलबजावणी धोरणाबाबत चर्चा करणे व त्यास मान्यता देणेवित्तीय वर्ष 2018-19 च्या ताळेबंदावर चर्चा व मान्यता देणेअंतर्गत व बाह्य लेखापरीक्षकांच्या लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणेवित्तीय वर्ष 2020-21 च्या वित्तीय अर्थसंकल्पावर चर्चा व मान्यता देणे. यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजयमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ.विनोद मोहितकरमंडळाचे सचिव श्री.व्ही.आर.जाधवतंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ.अभय वाघ तसेच विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.