नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे होणा-या आजाराला “कोविद-2019” असं नाव अधिकृतरित्या दिलं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस अज्ञनोम घेब्रेयेसुस यांनी काल जिनिव्हा इथं ही घोषणा केली. या शब्दाचा संदर्भ फक्त या विषाणूच्या गटाशी आहे.

कोरोना, वायरस आणि डिसीज या तिन्ही शब्दांची आद्याक्षरं मिळून हे नाव तयार केलं आहे. 2019 मधे त्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ते वर्ष या नावात समाविष्ट केलं आहे. संभ्रम टाळण्यासाठी या आजाराला अधिकृत नाव देण्याची मागणी संशोधकांनी केली होती.