नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वकप स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारत या स्पर्धेचा माजी विजेता आहे. या स्पर्धेच्या अंतिमफेरीत बांगलादेश हा पहिल्यांदाच पोहोचला असून भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत आपला एकही सामना गमावलेला नाही.

पाकिस्तानला हरवून अंतिम फेरीत आलेल्या भारतानं आतापर्यंत सात वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला असून बांगलादेशही दक्षिण अफ्रिका आणि न्युझिलंड सारख्या बलाढ्य संघांना हरवून अंतिम फेरीत पोहोचला आहे.