नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्यये सुरु असलेल्या बी. डब्ल्यू. एफ. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही सिंधूचा सामना आजपासून सुरु होणार आहेत. आज सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे.

साइना नेहवाल, किंदम्बी श्रीकांत, पी. कश्यप, बी.साईं प्रणीत यांचेही या स्पर्धेत एकेरी गटातील सामने होतील. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी भारतातर्फे खेळणार असून महिला दुहेरीत अश्विनी पोन्नाप्पा आणि एन सिक्की रेड्डी सहभागी होतील, मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा आणि एन सिक्की रेड्डी सहभागी होणार आहेत.