नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन, ‘रिसॅट-टू बी.आर-वन’ या भारतीय उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण केलं. हा उपग्रह कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावला आहे.
पी.एस.एल.व्ही.सी- 48 या प्रक्षेपकानं या उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांचे एकूण नऊ उपग्रह अंतराळात सोडले. पी.एस.एल.व्ही प्रक्षेपकाचं हे पन्नासावं उड्डाण आहे. रिसॅट-टू-बी आर-वन या उपग्रहावर, पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी एक्स बॅन्ड रडार बसवण्यात आलं असून, कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. इस्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी ही माहिती दिली.