नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोवेल कोरोना वायरसच्या नियंत्रण आणि प्रतिबंधनासाठी केलेल्या विविध उपाययोजनांच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीनं आढावा घेतला. आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर, विमान उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी आदी मंत्री उपस्थित होते.
यावेळी मंत्र्यांना कोविड – १९ च्या स्थिती विषयी माहिती देण्यात आली. केरळमधल्या ३ रुग्णांची स्थिती, चीनमधून येणा-यांसाठी विजावर प्रतिबंध आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.
वुहानमधून परत आलेल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या निरीक्षणगृहाची तसंच यापैकी कोणालाही विषाणूची लागण झाली नसल्याची माहिती यावेळी मंत्र्यांच्या समितीला देण्यात आली. आतापर्यंत हवाई तसंच समुद्र मार्गे आलेल्या २ लाख ४९ हजार लोकांच्या तपासणीविषयीची माहितीही यावेळी देण्यात आली.