नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतीवर अवलंबुन असून सध्याची वाढ ही त्यामुळेच ही दरवाढ झाली आल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमती वाढल्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात १४४ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहें. सवलतधारक गॅस ग्राहकांना सरकारकडून सबसिडी देऊन या दरवाढीमधून वगळण्यात आलं आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकांच्या सवलतीमधे प्रति सिलेंडरमागे १७५ ऐवजी ३१२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
काही विरोधी पक्षांनी या दरवाढीच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.