नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे दरम्यानच्या पहिल्या इलेक्ट्रीक इंटरसिटी बसचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झालं.
मुंबई-पुणे दरम्यान ही सेवा सुरु होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. एक खासगी कंपनी ही बस सेवा चालविणार आहे. दिल्ली-मुंबई कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर ही सेवा सुरु होईल, असंही ते म्हणाले.
या सेवेमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, तसंच प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळेल, आणि लवकरच तिकीट दरही कमी होतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
आमच्या सरकारनं जैव नैसर्गिक वायू इंधनावर आधारित वाहन निर्मितीवर भर दिला आहे, अशा दहा हजार बसेस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.