नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे मेट्रोच्या तीन मार्गीका येत्या २०२२ पर्यत कार्यान्वित होतील असा विश्वास माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्हा विकास समन्वय समितीची बैठक झाली.त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. फुगेवाडी ते संत तुकारामनगर आणि आंनदनगर ते गरवारे या मेट्रो मार्गिका येत्या मार्च महिनाअखेरपर्यंत सुरु होतील असं ते म्हणाले.
हिंजेवाडी मेट्रो मार्गिकेची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली, असून येत्या मार्च पर्यत भूमीहस्तांतरणाचं काम पूर्ण होईल असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन, जलदगतीनं काम पूर्ण करा, अशा सूचना ही जावडेकर यांनी आजच्या बैठकीत दिल्या.