नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या ताब्यात सध्या ५० भारतीय बोटी आणि एक भारतीय मच्छीमार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. श्रीलंकेच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय बोटी आणि मच्छीमारांच्या सुटकेसाठी योग्य ती पावलं उचलली जातील, अशी ग्वाही श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी नुकत्याच झालेल्या भारत दौर्यात दिल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली.
श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या मच्छीमारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे असं राजपक्षे यांनी सांगितलं होतं. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे मे २०१४ पासून श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या २ हजारांहून अधिक मच्छीमारांची आणि ३८० मासेमारी बोटींची सुटका झाली आहे, अशी माहिती राज्यमंत्र्यांनी दिली.