पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, सागर आंगोळकर, संतोष कांबळे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुलक्षणा शिलवंत – धर, शारदा सोनावणे, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, रामचंद्र माने, मानव कांबळे, शरद जाधव, रवींद्र दुधेकर, एस.एल. वानखेडे आदी उपस्थित होते.

त्यापूर्वी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुलक्षणा शिलवंत – धर, शारदा सोनावणे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, लेखाधिकारी प्रदीप बाराथे, कार्यकारी अभियंता एस.एस.मोरे, उपअभियंता प्रकाश साळवी, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, प्रभारी माहिती व जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.

त्यानंतर एच.ए.कॉलनी, पिंपरी येथील पुतळयासही महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसदस्य सागर अंगोळकर, संतोष कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुलक्षणा शिलवंत – धर, शारदा सोनावणे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

तसेच दापोडी येथे झालेल्या कार्यक्रमात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसदस्य सागर आंगोळकर, संतोष कांबळे, नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, आशा धायगुडे – शेंडगे, अनुराधा गोरखे, शारदा सोनावणे, सुलक्षणा शिलवंत – धर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रभारी माहिती व जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.