नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांच्याशी नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार आहेत.
पोर्तुगालचे अध्यक्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भेटणार असून राष्ट्रपती भवनात त्यांच्या स्वागतासाठी मेजवानी आयोजित केली आहे.
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडूही पाहुण्यांची भेट घेणार आहेत. डी सौसा चार दिवसांच्या भारत दौर्यासाठी काल नवी दिल्लीत पोचले.
त्यांच्या या दौर्यात दोन्ही देश उभयपक्षी संबंधातल्या प्रगतीचा आढावा घेतील. तसंच सहकार्याला नव्या बाबींवर चर्चा करतील.