नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर स्थानिक गुन्हे शाखेला पालघर जिल्ह्यात चार चाकी वाहनांची चोरी करणाऱ्या एका टोळीला पकडण्यात यश आलं आहे. टोळीकडून १९ महिंद्रा पिकअप गाड्या ६ महिंद्रा मॅक्स गाड्या आणि २ पिकअप टोईन व्हॅन अशा एकूण २७ पिकअप गाड्या मिळून आल्या आहेत.

या टोळीनं पालघर, गुजरात ,वलसाड, दादरा नगर हवेली अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून पिकअप गाड्या चोरी केल्या आहेत. आणि चोरीच्या गाड्यांची नंबर प्लेट बॉडी आणि इतर पार्ट बदलून २ ते ३ लाख रुपयांत या वाहनांची विक्री करायचे. यात ७ आरोपींना अटक करण्यात आली असून यातले ५ जण हे पालघर जिल्ह्यातले असून २ जण हे उत्तर प्रदेशातले मूळचे राहणारे आहेत.

यांनी ५५ पिकअप वाहनं ५ ठिकाणांहून चार चाकी गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि ४ ठिकाणाहून जनावरांची चोरी अशा प्रकारचे ६४ गुन्हे केलं असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.