नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळाला पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेल्या मंत्रीमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मंत्र्यांना ह्या नवीन मंत्रीमंडळात स्थान मिळालं आहे. यात मनिष सिसोदिया, सत्येंदर जैन, गोपाल राय, कैलाश गलहोत, इम्रान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे, तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते सांगली जिल्ह्यात अंजनी इथं माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. महाविकास आघाडीबाबत इतर कोणाच्याही वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं.