नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमध्ये काल एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

बाटलीतून पेट्रोल देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. नाशिक दौऱ्यात ठाकरे यांनी पीडित महिलेची भेट घेतली. ६७ टक्के भाजलेल्या अवस्थेत तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.