नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार देशाच्या आर्थिक तुटीसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सितारामन यांनी आज ‘जन जन का बजेट २०२१’ या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत हैदराबाद इथे उद्योगक्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
यावर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात एफ.आर.बी.एम. अर्थात आर्थिक जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यातल्या तरतुदींचा विचार करण्यात आल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
देशातल्या विविध घटकांच्या गरजा पूर्ण करणे आणि क्रयशक्ती वाढवणे यासाठी या अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या विविध भागात जाऊन, थेट नागिरीकांना अर्थसंकल्पाविषयी माहिती दिली जाण्याचा हा देशातल्या पहिलाच प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.