नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहिल आणि त्याबाबत भारताच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही, असे केंद्र सरकरने स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी काल इसलामाबाद इथे केलेल्या वक्तव्यासंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांला परराष्ट्र मंत्र्यालयाचे प्रवक्ते रविश कुमार उत्तर देत होते.पाकिस्ताने अवैधरित्या आणि बळजबरीने बळकावलेला भूभाग मुक्त करण्याच्या मुद्यावर तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कुठल्याही मुद्यावर द्विपक्षीय चर्चेद्वारे तोडगा काढला जाईल. यामध्ये तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाचा प्रश्नचं येत नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.

भारताविरुद्ध सीमेपलीकडून होत असलेल्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस पाकिस्तानला ठोस आणि विश्वासार्द पावल उचलायला सांगतील अशी आशा रविश कुमार यांनी व्यक्त केली. सीमेपलीकडून होत असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे जम्मू-काश्मीरसह भारतातील लोकांच्या जगण्याच्या अधिकाऱ्यांला धोका पोचला आहे, असे ते म्हणाले.