नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय मुस्लिमांच्या हज यात्रेला जाण्यासाठीच्या प्रक्रियेचे शंभर टक्के डिजिटलायझेशन झाल्यामुळे ही प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे, असं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितलं.

हज-2020 ची प्रक्रिया शंभर टक्के डिजिटल करणारं भारत हा पहिला देश ठरला आहे, असंही त्यांनी सांगितलं. ते आज मुंबईत हज हाऊस इथं आयोजित हज-2020 च्या “प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांचं प्रशिक्षण” या कार्यक्रमात बोलत होते.

मोदी सरकारनं केलेल्या अभूतपूर्व सुधारणांनी संपूर्ण हज प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक झाली आहे, असंही ते म्हणाले.

ऑनलाईन अर्ज, ई-व्हिसा, हज मोबाईल अॅप आणि मसिहा आरोग्य सुविधा यामुळे मक्का-मदिना इथं जाणा-या भारतीय मुस्लिमांना राहण्याची आणि वाहतुकीसंबंधीची सर्व माहिती पुरवली गेली आहे, असंही त्यांनी सांगितलं.