नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दादरा, नगर हवेली,  दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी राष्ट्रपतींनी आज दमण इथं आयुषमान योजनेअंतर्गत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा शुभारंभ केला.

सर्वांना आपल्या कर्तव्याप्रति जागरूक राहून देशहितासाठी कार्य करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. आज १५ नवीन आरोग्य केंद्रांची सुरूवात केली. सिल्वासातल्या विनोबा भावे रूग्णालयालचा विस्तार करून ६५० खाटां उपल्बध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती कोविंद यांनी दिली.

यावेळी राष्ट्रपतींनी या केंद्रशासित प्रदेशात राबण्यात असलेल्या स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते दमण जेट्टी ते जामपूर या सागरी मार्गाचं उद्घाटनही होणार आहे.