नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या हरियाणतल्या खेळाडूवर ६ कोटी रुपये देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिकणाऱ्या प्रत्येकी ३ कोटी रुपये तर राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सुवर्ण स्पर्धेत जिकणांऱ्याला दीड कोटी रुपये देण्यात येतील असे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले आहे.

ऑलिपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला १५ लाख रुपये दिले जाणार आहे. राज्यात खेळाला आणि खेळाडूला  प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याशिवाय खेळाडूना नोकरी देखील देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते काल रोहटक इथे महारुषी दयानंद विद्यापीठात पार पडलेल्या ४६ व्या जुनियर राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.