नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी ब्रिटनच्या नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्थेची घोषणा केली.
भारतासह जगभरातून गुणवंत आणि सर्वोत्तम लोकांना आकर्षित करुन घेणं हे या नव्या व्हिसा व्यवस्थेचं उद्दिष्ट आहे. या नव्या पद्धतीमुळे ब्रिटनमधे स्थलांतर करणा-या अकुशल आणि निकृष्ट कामगारांची संख्या कमी होईल, असं भारतीय वंशाच्या सर्वात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री पटेल यांनी सांगितलं.
ही नवी व्यवस्था एक जानेवारी 2021 पासून म्हणजेच ब्रिटनच्या युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या संक्रमण कालावधी संपल्यानंतर अंमलात येईल. विशिष्ट कौशल्ये अर्हता वेतन आणि व्यवसाय या गुणांवर आधारित ही नवी ब्रेक्झिटनंतरची व्यवस्था युरोपियन महासंघातील आणि महासंघाबाहेरच्या भारतासारख्या देशांसारखीच लागू होईल.