नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंवर देशांतर्गत औषध निर्माण करण्यासंदर्भात औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यां आणि वरिष्ठ सरकारी अधिका-यांबरोबर नीती आयोगानं काल चर्चा केली.

नीती आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष, अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात घोषणा केल्यानंतर ही बैठक झाली. औषध निर्माण संदर्भात विविध पैलूंवर चर्चा झाली. जेणेकरून चीनच्या औषधांवर अवलंबून राहता येणार नाही.