पिंपरी : जेएनएनयूआरएम (JNNURM) याअंतर्गत तयार झालेल्या घरकुलमधील आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांसाठी 2013 साली 160 बिल्डिंग 6250 फ्लॅटची घरकुल योजना उभारण्यात आली. आज या घरकुल योजनेतील मंडळी अतिशय प्रागतिक विचार करत मार्गक्रमण करत आहे.
सात मजली 160 बिल्डिंग असलेल्या या घरकुलमधील अशोक मगर यांच्या प्रयत्नातुन CSR फंड आणून प्रत्येक बिल्डिंगवर सोलर पॅनेल लावावेत ज्यायोगे, प्रत्येक बिल्डिंगच्या वीज खर्चात दर महिन्याला 10 ते 14 हजार बचत होईल याचाच अर्थ, दुर्बल आर्थिक गटातील नागरिकांचे उत्पन्न वाढेल. विशेष महत्वाची बाब म्हणजे या काम करणाऱ्या मंडळीची इच्छा आहे की, जी काही बचत होणार आहे, त्यातील काही भाग परत घरकुल योजनेत महिला सबलीकरण, विद्यार्थी मार्गदर्शन असे सामाजिक उपक्रम त्यांना राबवायचे आहेत.
विचार तर चांगलेच पण सोलर सिस्टीमचा खर्च देखील खूप जास्त, या नागरिकांना न परवडणारा, परंतु जेव्हा तुम्ही स्वविकासासाठी चांगल्या कामासाठी एक पाऊल पुढे टाकता, तेव्हा हजारो हात तुमच्या मदतीसाठी पुढे येतात. साधारण 8 कोटी रुपये खर्च करून, 1.6 MW ची सोलर प्रोजेक्ट या घरकुल योजनेत करायचा हा उद्देश आहे.
5 बिल्डिंगचा पथदर्शक प्रकल्पाचे शिवजयंतीला उदघाटन झाले, या पथदर्शक प्रकल्प दर तासाला जवळजवळ 1.5 टन कार्बोन डाय ऑक्सिइडचे उत्सर्जन कमी होणार आहे. 27 लाख रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाला CSR अंतर्गत रुपये 17.5 लाखाचे अनुदान मिळाले आहे. पितांबरी या प्रमुख ग्राहकोत्पादक कंपनी कडून आणि हा प्रकल्प, रोटरी क्लवब ऑफ पुणे सहवासच्या माध्यमातून अमलात येणार आहे. रोटरी क्लब सहवास अर्थातच अनेक सामाजिक कामासाठी घरकुलला मार्गदर्शन / मदत करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी पितांबरी कंपनीचे श्री. अजय जोशी, किरण गावडे, शमिंद्र कुलकर्णी, मिलिंद कडगावकर, पुणे सहवास रोटरी क्लबच्या प्रतिभाताई घोरपडे मॅडम, श्री. चंद्रकांत कुलकर्णी, PCMC CSR चे विजय वावरे, डेटम कंपनीचे संतोष जोशी, मेजर विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यास घरकुलमधील अशोक मगर, आबासाहेब गवळी, युवराज निलवर्ण, सुरेश सांडूर व सहकारी यांंच्या प्रयत्नाला यश आले.