नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात कटक इथं जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर आज आंतरविद्यापीठीय खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिग द्वारे या स्पर्धेचं उद्धाटन करतील. देशभरातल्या एकशे एकोणसाठ विद्यापीठातले ३४०० खेळाडू यात सहभागी  होणार आहेत. रग्बी या खेळासह १७ खेळांचा यात समावेश आहे.

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजु यांच्यासह अनेक मान्यवर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.