नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊ नये यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांनी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करण्याचंही केंद्र सरकारने ठरवले आहे. नवी दिल्लीत काल कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश करत असलेल्या उपाय योजना तसंच पूर्व तयारीविषयी आढावा बैठक झाली.

या बैठकीत हा निर्णय झाला. सध्या हाँगकाँग, थायलंड, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि जपानमधून येणाऱ्या प्रवाशांची, निश्चित केलेल्या २१ विमानतळांवर तपासणी केली जात आहे.