पिंपरी : स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौक जंक्शन ठरू लागला आहे. पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा चौक आहे. त्यासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीला लागून विकसित झालेल्या चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्कला जाण्यासाठी नागरिकांना, तसेच दोन्हीकडील कारखानदारांसाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण आहे.
या चौकातून असंख्य माल वाहतूक करणा-या वाहनांची वर्दळ असते. यामुळे या रस्त्यावरून रोजच प्रवास करणा-या नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ मंडळींना त्रास सहन करावा लागतो.
अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरवासियांची गरज लक्षात घेता महापालिकेने या ठिकाणी ग्रेडसेपरेटर बांधण्याचे नियोजन करावे, अशी मागणी नगरसेवक उत्तम केदळे व नगरसेविका कमल घोलप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.