पुणे : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा  मराठी विभाग आणि  जिल्हा माहिती  कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचे गुरुवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ.अमृता ओक तर पुणे विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांची प्रमुख उपस्थिती असेल. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने डॉ. युगंधर शिंदे यांचे व्याख्यान  व   विद्यार्थ्यांचे सादरीकरण होईल.

यामध्ये अनुराग गावकर  पोवाडा सादरीकरण, प्रतिक ढवळीकर याचे आईने लिहिलेले पत्राचे सादरीकरण, शशिकांत राऊत, याचे कीर्तन सादरीकरण, सचिन शिवले मराठी भाषेविषयी मनोगत, ॠतुजा चिंचपुरे यांची स्वरचित कविता अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात ॠतुजा चिंचपुरे, मोहिनी ननावरे यांचे गीत, प्रास्ताविक आणि स्वागत डॉ.वैजयंतीमाला जाधव, सूत्रसंचालन ॠतुजा चिंचपुरे तर आभार प्रदर्शन प्रा. विनोद पवार हे करणार आहेत.