मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी अनावरण झालं. यावेळी काही बग्गी चालकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्याही प्रदान केल्या गेल्या ही बग्गी पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालणारी आहे.

एकदा चार्ज केल्यावर या बग्गीतून ७० ते ८० किलो मीपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्यात बग्गी गेट वे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉइंट इथून प्रत्येकी ६ बग्गी सुटतील. सध्या संध्याकाळी ४ ते मध्यरात्रीनंतर २ वाजेपर्यंत पर्यटकांना बग्गीची सेवा उपलब्ध असेल.

यानंतर जुहू, बँडस्टँड, ठाणे तलाव पाळी या ठिकाणीही या सेवेचा विस्तार केला जाणार आहे. यासाठी मुंबईतल्या मोठ्या रेस्टॉरंटसोबतही करारही केला जाणार आहे. याआधी सुरु असलेला घोडागाड्या बंद झाल्यानं, या व्यवसायातल्या सुमारे अडीचशे बेरोजगारांना यात सामावून घेतलं जाणार आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहनमंत्री अॅडव्होकेट अनिल परब हे देखील यावेळी उपस्थित होते. मुंबई व्यतिरिक्त राज्यात पुणे आणि कोल्हापूर इथंही अशी सेवा सुरु करायची गरज आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.