पुणे (वृत्तसंस्था) : पुणे जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन व्हावं यासाठी ठोस उपाययोजना करायचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पवार यांनी काल बारामती इथं झालेल्या बैठकीत जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

लसीकरणाचा आणि कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यासोबतच, कोरोनाबाधितांच्या संपर्कात, आलेल्यांचा शोध आणि तपासणी करावी, संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, निकषांची पूर्तता होत असल्याची खात्री झाल्यावरच गृहविलगीकरणाला मान्यता द्यावी, वैद्यकीय साधनसामुग्रीचा तुटवडा जाणार नाही याची प्रशासनानं खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.