मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या बँक खाजगीकरण धोरणाच्या विरोधात देशभरातले बँक अधिकारी आणि कर्मचारी, आजपासून दोन दिवसाच्या संपावर जात आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातल्या १२, खाजगी १२, विदेशी सहा, तर ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकांमधले दहा लाखांवर कर्मचारी आणि अधिकारी, या संपात सहभागी होणार असल्याचं, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन चे महाराष्ट्र निमंत्रक, देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रातल्या तीस लाख कोटींचा व्यवसाय हाताळणाऱ्या, दहा हजार पेक्षा जास्त बँक शाखांमध्ये काम करणारे अंदाजे पन्नास हजार बँक कर्मचारी, तसंच अधिकारी या संपात सहभागी होणार असल्याचं, तुळजापूरकर यांनी सांगितलं.