पुणे : शहरात पुणे पोलिसांच्या वतीने हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्यानंतर आता शहरी भागात दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्यास होणाऱ्या कारवाईला स्थगिती मिळाली आहे.
याबाबात अधिक माहिती देताना आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहनचालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत व दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता.
हेच लक्षात घेत आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली.