नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आय.आय.टी तसंच भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अर्थात आय. आय. आय. टी मध्ये शैक्षणिक शुल्क जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी हा निर्णय असल्याची माहिती मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल दिली. दोन्ही संस्थांच्या बरोबर चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.