नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्णायक टप्प्यावर असून या प्राणघातक आजाराशी जगभरातले देश झगडत असल्यानं हे संकट विश्वव्यापी होत असल्याचं दिसत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेयेसुस यांनी म्हटलं आहे.

इराणमधे कोविड-१९ च्या बळींची संख्या वाढल्यानं तिथल्या इस्लामी तीर्थस्थळांची यात्रा करायला सौदी अरेबियानं आपल्या नागरिकांना मनाई केली आहे. तर जपान आणि इराकनं शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

आता केवळ चीनच नव्हे तर दक्षिण कोरिया आणि इटलीसह इतर देशांमधेही कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढल्यानं हे संकट विश्वव्यापी बनू लागलं आहे. या आजारानं आतापर्यंत दोन हजार ७६० जणांचा बळी घेतला असून ८१ हजारापेक्षा जास्त लोकांना लागण झाली आहे.