नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं दहशतवादी गटांना सक्रीय पाठिंबा देणं थांबवावं आणि आपल्या जनतेच्या कल्याणाकडे अधिक लक्ष द्यावं असं भारतानं म्हटलं आहे.

‘अपयशी देश’ ठरलेल्या पाकिस्तानात निर्दयपर्ण वागवल्या जाणा-या धार्मिक अल्पसंख्यकांकडे विशेष लक्ष द्यावं असंही भारतानं सुनावलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि कश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेपुढं पाकिस्तानानं उपस्थित केला त्यावर काल रात्री भारतानं हे कडक निवेदन दिलं.

जम्मू-कश्मीरमधली स्थिती झपाट्यानं पूर्वपदावर येत आहे असं भारतानं या निवेदनात सांगितलं.