नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालिबान आज कतारची राजधानी दोहा इथं शांतता करारावर स्वाक्ष-या करणार आहेत. भारत निरिक्षकाच्या भुमिकेत या कार्यक्रमाला उपस्थित राहील. भारताचे कतारमधले दूत पी कुमारन भारताचं प्रतिनिधित्व करतील.

अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत भारत मुख्य भागीदार आहे. या कराराचं पुढचं पाऊल म्हणून अमेरिका आपले हजारो सैनिक अफगाणिस्तानातून परत बोलावेल तर कायमच्या युद्धबंदीसाठी तालीबान अफगाण सरकार आणि इतर घटकांशी बोलणी करेल.