नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानं पारा थोडा खाली आला.

दिल्लीतल्या काही भागात संध्याकाळी पावसाला सुरुवात झाल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. अवकाळी पावसामुळे दिल्ली विमानतळावर उतरणारी  काही विमान लखनौ, अमृतसर, अहमदाबाद आणि जयपूरला वळवण्यात आली.

भूमध्य भागात झालेल्या चक्रीवादळामुळे हा पाऊस झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हिमाचल प्रदेशाच्या काही भागात हिमवृष्टी झाली. या भागात आजही हिमवृष्टी आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.