नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी राज्य आणि केंद्रशसित प्रदेशांच्या तयारीचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.
या बाबत खबरादारीचा उपाय म्हणून राज्य आणि केंद्रांमध्ये समन्वय साधला जात आहे, असंही त्यांनी सांगितलं. इराण, इटली आणि दक्षिण कोरियामध्ये या विषाणुचा प्रादुर्भाव ज्या झपाट्यानं होत आहे, ते पाहता सर्व राज्यांनी सतर्क राहून विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सर्व राज्यांनी विमानतळ सार्वजनिक आरोग्य अधिकार्यांची सर्व विमानतळांवर योग्य प्रमाणात नेमणूक करावी. तसंच या सर्व अधिकार्यांना विषाणुची लागण होऊ नये, म्हणून त्यांना योग्य ते साहित्य पुरवावं, असंही त्या म्हणाल्या.