नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदयाचे भाव  घसरत असल्यानं कांदा उत्पादकांनी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. शेतक-यांनी लासलगाव, देवळा,पिंपळगाव, येवला आणि अंदेरसूळ इथं निदर्शनं केली, तर नाशिक औरंगाबाद महामार्गही रोखून धरला होता.

कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्यामुळे शासनानं 27 फेब्रुवारीला कांदा निर्यातबंदीचा आदेश मागे घेतला होता, पण त्यासंबंधीची लेखी अधिसूचना अजून जारी केलेली नाही. त्यामुळे भाव घसरत आहेत.