नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्थाननं केलेल्या ड्रोन हल्ल्यात, काल सिरीयाच्या शासनपुरस्कृत सैन्य दलाचे १९ जवान ठार झाले.
सिरीयाच्या इदलीब प्रांतातल्या लष्करी तळांना लक्ष्य करून तुर्कस्थाननं हे ड्रोन हल्ले केले. गेल्या ७२ तासांत झालेल्या अशा स्वरुपाच्या हल्ल्यांमध्ये, आत्तापर्यंत सिरीया सरकार पुरस्कृत लष्कराचे जवान आणि सिरीयासरकार समर्थक गटाचे एकूण ९३ जण ठार झाले आहेत.
याआधी सिरायाच्या सैन्यानंही ईदलिब इथं तुर्कस्थानचे ३ ड्रोन पाडले होते.मागच्या आठवड्यात गुरुवारी एका हवाई हल्ल्यात तुर्कस्थानचे ३४ सैनिकही मारले गेले होते. हा हल्ला सिरीयानं केला होता, असा आरोप तुर्कस्ताननं केला होता.