नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणीस्तानच्या ताब्यात असलेल्या बंडखोर कैद्यांची सुटका करावी, ही अमेरिका आणि तालिबान यांच्यातल्या करारातली महत्वाची अट अफगाणीस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी फेटाळली आहे.

मात्र तरीदेखील संपूर्णतः युद्धबंधी व्हावी यासाठी हिंसंक घटनांचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरुच राहतील असंही त्यांनी सांगितलं. ते काल काबुल इथं बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशांमध्ये कतार इथं काल हा करार झाला.या करारात, १० मार्चपर्यंत अफगाण सरकारच्या एक हजार अधिकाऱ्यांच्या बदल्यात ५ हजार तालिबान्यांची सुटका करावी असं म्हटलं आहे.

या कररानुसार, शांतता प्रस्थापित करण्यासाठी तालिबान्यांनी अफगाणिस्तानसोबत प्रत्यक्ष चर्चा सुरु केल्यानंतर तिथे असलेल्या इतर देशांच्या फौजांना त्या त्या देशानं १४ महिन्यांच्या आत माघारी बोलवावं असं म्हटलं आहे.