नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानं जगभरात आतापर्यंत तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे, तर चीनमध्ये या आजारानं आतापर्यंत दोन हजार ९१२ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी चीनमध्ये उद्रेक झालेला हा आजार आता ६० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोविड-१९ या आजाराचा पहिला रुग्ण गेल्या आठवड्यात सापडला आहे. मात्र इटली आणि युरोपमध्ये याचा प्रसार झपाट्याने झाला.

कोरोना विषाणूचा संसर्ग हा विशेषकरुन ६० वर्षे वयाच्या पुढच्या लोकांना होत आहे, ज्यांना वयोमानाप्रमाणे इतर आजार ही होतात, असं जागतिक आरोग्य संघटनेनं काल म्हटलं आहे.