नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तान लष्करानं युद्धबंदीचं उल्लंघन करून भारतीय सैनिकांच्या चौक्यांवर तसंच नागरी भागांत अंदाधुंद गोळीबार केला.
पहाटेच्या वेळेस पाकिस्तानी फौजांनी सीमावर्ती पूँछ जिल्ह्यातल्या मनकोटे आणि मेंधर भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार केला, तसंच उखळी तोफांचा मारा केला. मात्र, सतर्क भारतीय फौजांनी पाकिस्तानी गोळीबाराला चोख उत्तर दिलं. पाच वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता, संरक्षण प्रवक्त्यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.