नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या वहिल्या हिवाळी स्पर्धांचं आज जम्मू-काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर क्रीडा परिषदेनं संयुक्तपणे आयोजित केलेल्या या पाच दिवसांच्या क्रीडा महोत्सवात सुमारे ९०० खेळाडू सहभागी होत आहेत.

यामध्ये विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. रिजिजू यांनी काल गंदेरबल इथं आयोजित एका कार्यक्रमात भाग घेऊन, युवकांशी संवाद साधला. तरुण पिढीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा आणि एकता हे गुण वाढीला लागावे, या अनुषंगानं कार्यक्रमात चर्चा झाली.