नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेतले ४९ टक्के समभाग खरेदी  करायला भारतीय स्टेट बँकेच्या संचालक मंडळानं तत्वतः मंजूरी दिली आहे, असं स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आज मुंबईत वार्तांहर परिषदेत सांगितलं.

आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेच्या पुर्नरचनेच्या प्रस्तावावर स्टेट बँकेची कायदा आणि गुतंवणूक समिती विचार करत असल्याचं ते म्हणाले. येस बँकेच्या खातेदारांची सध्या गैरसोय होत आहे मात्र त्यांच्या  ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.