नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनौषधी केंद्रांमुळे सर्वानाचं वाजवीदरात औषध सहज उपलब्ध होऊ लागल्यानं सर्वसामान्याचं आयुष्य सुखकर झालं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जनौषधी दिवसानिमित्त, या योजनेतल्या काही लाभार्थ्यांशी आणि औषध दुकानदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधताना, ते आज नवी दिल्लीत बोलत होते.
या केंद्रांमध्ये मूळ किमंतीपेक्षा 50 ते 90 टक्के कमी दरानं औषध मिळतात. तसंच ती पूर्णपणे सुरक्षित आणि उच्च दर्जाची असतात, असं ते म्हणाले. प्रत्येक नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी, केंद्रसरकार वचनबद्ध आहे, परवडण्याजोगे उपचार, दर्जेदार रुग्णालयं आणि वैद्यकीय कर्मचारी या गोष्टींना सरकारचं प्राधान्य आहे, असं त्यांनी सांगितलं.
डॉक्टारांनी रुग्णांना जेनेरिक औषधं घेण्याचा सल्ला द्यावा, असं आवाहान त्यांनी केलं. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, डॉक्टारांचा सल्ला घ्यावा, असं प्रधानमंत्री म्हणाले.