नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि बालकांचं सरंक्षण करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारनं आंध्र प्रदेश दिशा कायदा २०१९ आणि आंध्र प्रदेश गुन्हेगारी कायदा २०१९ च्या कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.
दिशा कायद्यात महिलांविरुद्ध गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराला देहदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. महिलांचं लैंगिक शोषण, ऍसिड हल्ला, बालकांवरील अत्याचार इत्यादी गुन्ह्यांसाठी या कायद्यात कडक शिक्षेची तरतूद आहे.