नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या जास्तीत जास्त महिलांना उपजीविकेचं साधन मिळावं या हेतूनं २०२२ पर्यंत एकूण ७५ लाख स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना आहे, असं केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं.

जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणं हे केंद्र सरकारच्या दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले.

देशात सध्या ६० लाख स्वयंसहायता गट असून त्याद्वारे ६ कोटी ७३ लाख महिला एकत्र येऊन कार्य करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.