नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं उद्या सुरू होणार असलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन पटू सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिक पात्रता फेरी २८ एप्रिल रोजी संपणार आहे.

तत्पूर्वी जगज्जेती पी. वी. सिंधू हिच्यासह सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांचा अधिकाधिक गुणांक मिळवण्यावर भर असेल.